निर्गम 3:11-14
निर्गम 3:11-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएली लोकांस मिसर देशामधून काढून आणणारा असा मी कोण आहे?” देवाने उत्तर दिले, “खचीत, मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला पाठवत आहे याची खूण हीच असेल; तू इस्राएली लोकांस मिसरमधून बाहेर आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल.” मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएली लोकांकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?” देव मोशेस म्हणाला, “जो मी आहे तो मी आहे. देव म्हणाला. तू इस्राएल लोकांस सांग, मी आहे याने मला तुम्हांकडे पाठवले आहे.”
निर्गम 3:11-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण मोशे परमेश्वराला म्हणाला, “मी कोण आहे की मी फारोहकडे जावे आणि इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर आणावे?” परमेश्वराने म्हटले, “मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला पाठविले आहे याचे चिन्ह हेच असणार: जेव्हा तू इस्राएली लोकांना इजिप्त देशातून बाहेर आणशील, तेव्हा याच डोंगरावर तुम्ही परमेश्वराची उपासना कराल.” परंतु मोशेने परमेश्वराला विचारले, “जर मी इस्राएली लोकांकडे गेलो आणि त्यांना सांगितले, तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने मला पाठविले आहे, तर ते मला विचारतील, त्यांचे नाव काय आहे? तर मी त्यांना काय सांगू?” परमेश्वर मोशेला म्हणाले, “जो मी आहे तो मी आहे. इस्राएली लोकांना सांग: ‘मी आहे’ यांनी मला पाठवले आहे.”
निर्गम 3:11-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांना मिसरातून काढून आणणारा असा मी कोण?” देव म्हणाला, “खचीत मी तुझ्याबरोबर असेन; मी तुला पाठवले ह्याची खूण हीच : तू लोकांना मिसरातून काढून आणल्यावर ह्याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल.” तेव्हा मोशे देवाला म्हणाला, “पाहा, ‘मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुमच्याकडे पाठवले आहे,’ असे मी इस्राएलवंशजांकडे जाऊन त्यांना सांगितले असता ‘त्याचे नाव काय’ असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू?” देव मोशेला म्हणाला, “मी आहे तो आहे; तू इस्राएलवंशजांस सांग, ‘मी आहे’ ह्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे.”