निर्गम 20:8-11
निर्गम 20:8-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव; सहा दिवस श्रम करून तू तुझे कामकाज करावेस; परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझे दास व दासी यांनी तसेच तुझे पशू, किंवा तुझ्या वेशीत राहणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये; कारण परमेश्वराने सहा दिवस काम करून आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही उत्पन्न केले आणि त्यानंतर सातव्या दिवशी विसावा घेतला; या प्रमाणे परमेश्वराने शब्बाथ दिवस हा आशीर्वाद देऊन तो पवित्र केला आहे.
निर्गम 20:8-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळून त्याची आठवण ठेवा. सहा दिवस तुम्ही परिश्रम करावेत आणि आपली सर्व कामे करावी. परंतु सातवा दिवस याहवेह तुमचे परमेश्वर यांचा शब्बाथ आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये, तुम्ही किंवा तुमचा पुत्र किंवा कन्या, तुमचा दास किंवा दासी, तुमचे पशू किंवा तुमच्या नगरात राहणारा परदेशी यांनी देखील कोणतेही काम करू नये. कारण सहा दिवसात याहवेहने आकाश व पृथ्वी, सागर आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, परंतु सातव्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली, म्हणून याहवेहने शब्बाथ दिवस आशीर्वादित करून तो पवित्र केला.
निर्गम 20:8-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. सहा दिवस श्रम करून आपले सर्व कामकाज कर; पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस; तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरा, ह्यांनीही करू नये; कारण सहा दिवसांत परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला; म्हणून परमेश्वराने शब्बाथ दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला.