YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 2:3-4 - Compare All Versions

निर्गम 2:3-4 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

पुढे आणखी तिला तो लपवून ठेवता येईना म्हणून तिने एक लव्हाळ्याची पेटी तयार केली; तिला राळ व डांबर लावले. तिने त्या बाळाला पेटीत ठेवून ती पेटी नदीच्या तीरी लव्हाळ्यात नेऊन ठेवली. त्याची बहीण, त्याचे पुढे काय होते ते पाहण्यासाठी तेथून दूर बाजूला उभी राहिली.

सामायिक करा
निर्गम 2 IRVMAR

निर्गम 2:3-4 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

पण त्यानंतर त्याला ती लपवू शकत नव्हती, तेव्हा तिने त्याच्यासाठी लव्हाळ्याची एक टोपली घेतली, व तिला डांबर आणि चुन्याचा लेप लावला. मग तिने आपल्या बाळाला त्या टोपलीत ठेवले व ती टोपली तिने नाईल नदीच्या काठी लव्हाळ्यात नेऊन ठेवली. बाळाचे पुढे काय होते हे पाहण्यासाठी त्याची बहीण दुरून त्याच्यावर नजर ठेऊन उभी राहिली.

सामायिक करा
निर्गम 2 MRCV

निर्गम 2:3-4 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्यांचा एक पेटारा करून त्याला डांबर व राळ चोपडली; त्या पेटार्‍यात तिने त्या बालकाला घालून नदीकाठच्या लव्हाळ्यांत नेऊन ठेवले; आणि त्याचे पुढे काय होते ते पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली.

सामायिक करा
निर्गम 2 MARVBSI