निर्गम 2:11-12
निर्गम 2:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
काही दिवसानी असे झाले की, मोशे मोठा झाल्यावर आपल्या लोकांकडे गेला आणि त्याने त्यांची कष्टाची कामे पहिली. कोणी एक मिसरी आपल्या इब्री मनुष्यास मारत असताना त्याने पाहिले. तेव्हा आपल्याकडे पाहणारा आजूबाजूला कोणीही नाही हे जाणून मोशेने त्या मिसराच्या मनुष्यास जिवे मारले व वाळूत पुरून टाकले.
निर्गम 2:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मोशे तरुण झाल्यानंतर, एक दिवस तो आपल्या लोकांना भेटायला गेला असताना त्याने त्यांना कष्टाने राबत असताना बघितले. इजिप्तचा एक मनुष्य त्याच्या इब्री बांधवाला मारहाण करीत असल्याचे मोशेने पाहिले. आपल्याला कोणीही पाहत नाही, हे बघून त्याने त्या इजिप्ती मनुष्याला ठार केले आणि त्याला वाळूत लपवून टाकले.
निर्गम 2:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदांकडे जाऊन त्यांचे काबाडकष्ट पाहिले; त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदांपैकी एका इब्र्याला कोणी मिसरी मारत असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडेतिकडे सभोवार नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिसर्यास ठार करून त्याला वाळूत लपवले.