Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

एस्तेर 7:7 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

एस्तेर 7:7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेव्हा राजा क्रोधायमान होऊन भोजनावरून उठला व राजमंदिराच्या बागेत गेला; तेव्हा ‘मला प्राणदान द्या’ अशी विनवणी करीत हामान एस्तेर राणीपुढे उभा राहिला; कारण राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे हे त्याला समजून चुकले.

सामायिक करा
एस्तेर 7 MARVBSI

एस्तेर 7:7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

राजाला अतिशय संताप आला. द्राक्षरस तसाच टाकून तो उठला आणि बाहेर राजबागेत गेला, पण हामान आपले प्राण वाचवण्याची याचना करत आत राणी एस्तेरजवळ उभा राहिला. राजाने आपले वाईट करण्याचे ठरवले आहे असे त्याने पाहिले.

सामायिक करा
एस्तेर 7 IRVMAR

एस्तेर 7:7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

हे ऐकताच राजा तीव्र संतापाने एकदम उठला आणि त्याचे मद्य सोडून बाहेर राजवाड्याच्या बागेत गेला. इकडे हामान, राजाने आता आपले भवितव्य ठरविले आहे, हे ओळखून आपले प्राण वाचवावे म्हणून एस्तेर राणीजवळ विनवणी करण्यासाठी तिथेच थांबला.

सामायिक करा
एस्तेर 7 MRCV