एस्तेर 4:13-14
एस्तेर 4:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मर्दखयाला तिचा निरोप मिळाल्यावर त्याने एस्तेरला आपले उत्तर पाठवले. “राजमहालात राहतेस म्हणून तू यहूदी लोकांतून सुरक्षित सुटशील असे समजू नकोस. तू आत्ता गप्प बसलीस तर यहूद्यांना दुसऱ्या ठिकाणाहून सुटका आणि मुक्ती मिळेल, पण तुझा आणि तुझ्या पित्याच्या घराण्याचा मात्र नाश होईल. कोणी सांगावे, या अशा काळासाठीच कदाचित तुझी राणी म्हणून निवड झाली असेल.”
एस्तेर 4:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मर्दखयाने हे प्रत्युतर एस्तेरला पाठविले: “असा विचार करू नको की तिथे राजवाड्यात आहेस म्हणून इतर सर्व यहूदी मारले जात असताना तू एकटी वाचशील. अशा प्रसंगी तू जर शांत राहशील, तर दुसर्या मार्गाने यहूदी लोकांकरिता मुक्ती व उद्धार येईल, परंतु तू आणि तुझ्या वडिलाचे कुटुंब नाश पावेल. पण कोणजाणे कदाचित अशाच प्रसंगासाठी तुला हे शाही पद मिळाले असेल का?”
एस्तेर 4:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा त्याने त्याच्या हस्ते एस्तेरला सांगून पाठवले की, “तू राजमंदिरात आहेस म्हणून तू यहूदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नकोस. तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसर्या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?”