YouVersion लोगो
सर्च आयकॉन

एस्तेर 2:8-9 - Compare All Versions

एस्तेर 2:8-9 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शूशन राजवाड्यात हेगेच्या हवाली करण्यात आल्या; तेव्हा एस्तेर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचा रक्षक हेगे ह्याच्या ताब्यात दिले. ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तो तिच्यावर प्रसन्न झाला; त्याने काहीएक विलंब न लावता तिच्या शुद्धतेच्या वस्तू, तिचे भोजनपदार्थ आणि तिला निवडक अशा सात सख्या राजवाड्यातून दिल्या आणि तिला व तिच्या सख्यांना तेथून नेऊन अंतःपुरात सर्वांहून उत्तम जागा राहण्यास दिली.

सामायिक करा
एस्तेर 2 MARVBSI

एस्तेर 2:8-9 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

जेव्हा राजाची आज्ञा लोकांपर्यंत पोचल्यावर, पुष्कळ मुलींना शूशन राजवाड्यात आणून हेगेच्या देखभालीखाली ठेवण्यात आले. त्या मुलींमध्ये एस्तेरही होती. हेगे राजाच्या जनानखान्याचा प्रमुख होता. त्यास ती तरुणी आवडली आणि तिच्यावर त्याची कृपादृष्टी झाली. त्याने तिला ताबडतोब सौंदर्यप्रसाधने पुरवली आणि तिच्या अन्नाचा भाग दिला. त्याने राजाच्या राजवाड्यातील सात दासी नेमून तिला दिल्या आणि तिला व तिच्या सात तरुण दासींना त्याने अंत:पुरातील उत्तम जागा राहण्यास दिली.

सामायिक करा
एस्तेर 2 IRVMAR

एस्तेर 2:8-9 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

जेव्हा आता राजाची आज्ञा जाहीर करण्यात आली, तेव्हा अनेक तरुण कुमारिका शूशन राजवाड्यातील अंतःपुरात आणण्यात आल्या व हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आल्या. एस्तेरलाही राजवाड्यात आणून अंतःपुराचा अधिकारी हेगाइच्या देखरेखीत ठेवण्यात आले. एस्तेरला पाहून अंतःपुराचा अधिकारी हेगाइची कृपादृष्टी तिच्यावर झाली; आणि लगेचच तिच्यासाठी त्याने सौंदर्यप्रसाधनांची व खास भोजनपदार्थांची व्यवस्था केली. राजवाड्यातील सात दासी तिच्या तैनातीला त्याने दिल्या व तिला त्यांच्यासह अंतःपुरातील सर्वात उत्तम दालनात हालविले.

सामायिक करा
एस्तेर 2 MRCV