एस्तेर 2:13-14 - Compare All Versions
एस्तेर 2:13-14 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि राजाकडे जायच्या वेळी अशी पध्दत होती, अंत:पुरातून राजमंदिरात जाण्यासाठी जे काही ती मागे ते तिला मिळत असे. संध्याकाळी ती राजाकडे जाई आणि सकाळी ती दुसऱ्या अंतःपुरात परत येत असे. तिथे शाशगज नावाच्या खोजाच्या हवाली केले जाई. शाशगज हा राजाच्या उपपत्नीची देखरेख करणारा खोजा होता. राजाला जी कन्या पसंत पडेल तिला तो नांव घेऊन बोलावत असे. एरवी या मुली पुन्हा राजाकडे जात नसत.
एस्तेर 2:13-14 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग जेव्हा प्रत्येक तरुणी राजाकडे जाई तेव्हा: वस्त्रांची व अलंकारांची अंतःपुरातून आपल्या इच्छेप्रमाणे निवड करून राजमहालात नेण्याची तिला मोकळीक होती. तिला संध्याकाळी नेण्यात येई आणि दुसर्या दिवशी सकाळी राजाच्या उपपत्नी राहत, त्या अंतःपुराच्या दुसर्या भागात ती जाई. तिथे ती राजाच्या खोजांपैकी शाशगज नावाच्या खोजाच्या देखरेखीखाली असे. राजाने तिचे नाव घेऊन तिला परत बोलाविले नाही, तर राजाकडे तिला पुन्हा पाठविले जात नसे.
एस्तेर 2:13-14 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कुमारीने राजाकडे जाण्याचा प्रकार असा : अंतःपुरातून राजमंदिरात जाताना जे काही ती मागे ते तिला देण्यात येई; संध्याकाळी ती जात असे; आणि सकाळी ती उपपत्न्यांचा रक्षक राजाचा खोजा शाशगज ह्याच्या देखरेखीखाली दुसर्या अंतःपुरात जाई; राजाने तिच्यावर प्रसन्न होऊन तिचे नाव घेऊन बोलावल्यावाचून ती पुन्हा त्याच्याकडे जात नसे.