इफिसकरांस पत्र 6:14-17
इफिसकरांस पत्र 6:14-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा; शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.
इफिसकरांस पत्र 6:14-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा. शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला. नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या, जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा. आणि तारणाचे शिरस्राण व आत्म्याची तलवार, जी देवाच वचन आहे, ती घ्या
इफिसकरांस पत्र 6:14-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा. परमेश्वराच्या शांतीची शुभवार्ता गाजविण्याची तत्परता ही पादत्राणे घालून तयार राहा. या सर्व व्यतिरिक्त विश्वासरूपी ढाल घ्या, जिच्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे अग्निबाण विझवू शकाल. तारणाचे शिरस्त्राण, आणि आत्म्याची तरवार म्हणजे परमेश्वराचे वचन हे देखील घ्या.
इफिसकरांस पत्र 6:14-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा; शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा, आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.
इफिसकरांस पत्र 6:14-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपली कंबर सत्याने कसा. नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी लाभलेली सिद्धता पादत्राणे म्हणून पायी चढवा आणि जिच्यायोगे त्या दुष्टांचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल नेहमी जवळ बाळगा. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन हाती घ्या.