इफिसकरांस पत्र 4:31-32
इफिसकरांस पत्र 4:31-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सर्व प्रकारची कटूता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा आणि देवाने ख्रिस्तामध्ये मुक्तपणे क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.
इफिसकरांस पत्र 4:31-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्वप्रकारचा कडूपणा, संताप आणि राग, भांडणे आणि निंदानालस्ती याबरोबरच सर्वप्रकारचा द्वेषभाव सोडून द्या. एकमेकांना दयाळू व कनवाळूपणे वागवा; जशी परमेश्वराने तुम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा केली, तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा.
इफिसकरांस पत्र 4:31-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करण्यात येवोत; आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.
इफिसकरांस पत्र 4:31-32 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रत्येक प्रकारची कटुता, राग, क्रोध, गलबला व निंदानालस्ती सर्व प्रकारच्या दुष्टपणासह तुमच्यापासून दूर करा. उलट, तुम्ही एकमेकांबरोबर चांगुलपणाने व सहृदयतेने वागा. जशी देवाने ख्रिस्तात तुम्हांला क्षमा केली आहे, तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.