इफिसकरांस पत्र 2:15-17 - Compare All Versions
इफिसकरांस पत्र 2:15-17 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने आज्ञाविधीचे कायदे आणि नियमशास्त्र आपल्या देहाने रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मनुष्य निर्माण करून शांती आणावी. त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याव्दारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा. ख्रिस्त आला आणि त्याने जे दूर होते त्यांना अणि जे जवळ होते त्यांना शांतीची सुवार्ता सांगितली.
इफिसकरांस पत्र 2:14-17 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ते स्वतःच आपली शांती आहेत, त्यांनी दोन गटास एक केले आणि त्यांना विभक्त करणारी शत्रुत्वाची भिंत पाडली. त्यांनी आपल्या देहाने नियमशास्त्राला त्यांच्या आज्ञापालन व विधीसहित दूर केले. यात त्यांचा उद्देश हा होता की या दोघांमधून स्वतःसाठी एक नवा मनुष्य उत्पन्न करून शांती प्रस्थापित करावी. कारण त्यांनी क्रूसाद्वारे वैरभाव नाहीसा करून व दोघांना एक शरीर करून परमेश्वराशी समेट घडवून आणला. तुम्ही जे त्यांच्यापासून फार दूर होते आणि जे जवळ होते, अशा दोघांसाठी ते आले व त्यांनी शांतीचा प्रचार केला.
इफिसकरांस पत्र 2:15-17 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपल्या देहाने वैर, म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र नाहीसे केले; ह्यासाठी की, स्वत:च्या ठायी दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी; आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्या द्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. आणि त्याने येऊन जे तुम्ही ‘दूर होता’ त्या तुम्हांला ‘शांतीची सुवार्ता सांगितली व जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली
इफिसकरांस पत्र 2:15-17 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले, हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र, ह्यासाठी की, स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी, व त्याच्या क्रुसावरील बलिदानाने दोघांतील वैर नाहीसे करून दोघांना एक शरीर करून दोघांचा देवाशी समेट करावा. त्याने येऊन जे तुम्ही दूर होता, त्या तुम्हांला आणि जे जवळ होते त्या यहुदी लोकांनाही शांतीचे शुभवर्तमान सांगितले.