YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 1:4-7

इफिसकरांस पत्र 1:4-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना जगाच्या रचनेपूर्वीच निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे. देवाच्या प्रीतीप्रमाणे, येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली. त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली. त्या प्रिय पुत्राच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे, देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.

इफिसकरांस पत्र 1:4-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठायी, त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती, म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा, आपल्याला मिळाली आहे.

इफिसकरांस पत्र 1:4-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आपण प्रीतीत त्याच्या समक्ष पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने निवडले आहे. त्याच्या ह्या वैभवशाली कृपेबद्दल आपण त्याची स्तुती करू या. त्याच्या प्रिय पुत्रामध्ये त्याने आपल्याला हे अनमोल वरदान दिले आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीनुसार त्याच्या रक्‍ताद्वारे खंडणी भरून मिळविलेली मुक्ती म्हणजे अपराधांची आपल्याला क्षमा मिळाली आहे.