इफिसकरांस पत्र 1:16-18
इफिसकरांस पत्र 1:16-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबवले नाही. मी अशी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हास आपल्या ओळखीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा; म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की, त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे
इफिसकरांस पत्र 1:16-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवून तुम्हासाठी आभार मानण्याचे मी थांबविले नाही. माझे हे मागणे आहे, की तुम्ही त्यांना अधिक चांगल्या रीतीने ओळखावे म्हणून परमेश्वर, जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरवशाली पिता, यांनी तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. मी प्रार्थना करतो की तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित केले जावेत, आणि पवित्र जनांमध्ये असलेल्या गौरवशाली वतनाच्या संपत्तीच्या आशेसाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, हे तुम्ही ओळखून घ्यावे.
इफिसकरांस पत्र 1:16-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो; मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा; म्हणजे त्यामुळे तुमचे अंतश्चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, ‘पवित्र जनांमध्ये’ त्याने दिलेल्या ‘वतनाच्या’ वैभवाची समृद्धी केवढी
इफिसकरांस पत्र 1:16-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मीही तुमच्यासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो, मी माझ्या प्रार्थनेमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला त्याच्या स्वरूपाविषयीचे ज्ञान व प्रकटीकरण देणारा पवित्र आत्मा द्यावा. म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा, पवित्र लोकांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी