इफिसकरांस पत्र 1:11-12
इफिसकरांस पत्र 1:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो, ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहूदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली.
इफिसकरांस पत्र 1:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण ज्यांच्या इच्छेनुसार व उद्देशानुसार जे सर्वकाही चालवितात, त्यांच्या पूर्व योजनेनुसार आपण त्यांच्यामध्ये निवडलेले होतो. यात उद्देश असा होता की, आपण ज्यांनी ख्रिस्तावर प्रथम आशा ठेवली होती, त्यांनी त्यांच्या गौरवाच्या स्तुतीचे साधन व्हावे.
इफिसकरांस पत्र 1:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार1 झालो आहोत; ह्यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती, त्या आमच्याकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी.
इफिसकरांस पत्र 1:11-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो सर्व काही चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे ख्रिस्तावरील आपल्या निष्ठेमुळे त्याने आपल्याला त्याचे वारसदार म्हणून निवडले आहे. सुरुवातीपासून ख्रिस्तावर भिस्त ठेवून असलेले आपण परमेश्वराच्या वैभवाबद्दल त्याची स्तुती करू या.