उपदेशक 7:1-6
उपदेशक 7:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
किंमती सुगंधी द्रव्यापेक्षा चांगले नाव असणे हे उत्तम आहे, आणि जन्मदिवसापेक्षा मरण दिवस उत्तम आहे. मेजवाणीच्या घरी जाण्यापेक्षा, शोक करण्याऱ्याच्या घरी जाणे उत्तम आहे, जिवंतांनी हे मनात बिंबवून ठेवावे. म्हणून जिवंत हे मनात ठसवून राहील. हास्यापेक्षा शोक करणे चांगले आहे. कारण चेहरा खिन्न असल्याने नंतर हृदयात आनंद येतो. शहाण्याचे मन शोक करणाऱ्याच्या घरात असते, पण मूर्खाचे मन मेजवाणीच्या घरात असते. मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेध वाणी ऐकणे उत्तम आहे. भांड्याखाली जळत असलेल्या काट्यांच्या कडकडण्यासारखे मूर्खाचे हसणे आहे. हे सुद्धा व्यर्थच आहे.
उपदेशक 7:1-6 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सन्माननीय नाव हे सुवासिक अत्तरापेक्षा उत्तम आहे, आणि मृत्युदिन जन्म दिवसापेक्षा उत्तम आहे. मेजवानीच्या घरी जाण्यापेक्षा शोकाकुल घरात जाणे हे अधिक उत्तम आहे, प्रत्येक मनुष्याने ही गोष्ट लक्षात ठेवावी; मृत्यू हे सर्वांचे विधिलिखित आहे. विलाप करणे हे हसण्यापेक्षा बरे, कारण दुःखी चेहरा हृदयासाठी बरा आहे. सुज्ञानी मनुष्याचे हृदय शोकाकुल घरात असते, परंतु मूर्खांचे हृदय सुखाच्या घरात असते. सुज्ञानी व्यक्तीच्या निषेधाकडे लक्ष देणे मूर्खाचे गीत ऐकण्यापेक्षा उत्तम आहे. मूर्खाचे हसणे हे पात्राखालील अग्नीतील तडतडणाऱ्या काट्यांप्रमाणे आहे, हे सुद्धा व्यर्थ आहे.
उपदेशक 7:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा. भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे; जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील. हसण्यापेक्षा खेद करणे बरे; मुद्रा खिन्न असल्याने मन सुधारते. शहाण्यांचे चित्त शोकगृहाकडे लागते; पण मूर्खांचे चित्त हास्यविनोदगृहाकडे लागते. मूर्खांचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेधवाणी ऐकणे बरे. कारण मूर्खाचे हास्य हंड्याखाली जळणार्या काट्याकुट्यांच्या कडकडण्यासारखे असते; हेही व्यर्थ होय.