उपदेशक 3:1-4
उपदेशक 3:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो. जन्माला येण्याची आणि मरण्याचीही वेळ असते. रोप लावण्याची आणि ते उपटून टाकण्याचीही वेळ असते. ठार मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते. मोडण्याची वेळ आणि बांधण्याचीही वेळ असते. रडण्याची वेळ आणि हसण्याचीही वेळ असते. शोक करण्याची वेळ आणि नाचण्याचीही वेळ असते.
उपदेशक 3:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रत्येक गोष्टींसाठी निश्चित वेळ आहे, आणि पृथ्वीवर प्रत्येक कामासाठी एक ऋतू ठरलेला असतो: जन्म होण्याची वेळ आणि मृत्यू येण्याची वेळ, पेरणीची वेळ आणि कापणीची वेळ, ठार मारण्याची वेळ आणि बरे करण्याची वेळ आहे; विध्वंसाची वेळ आणि बांधण्याची वेळ आहे; रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ आहे; शोक करण्याची आणि नाचण्याची वेळ आहे
उपदेशक 3:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो : जन्मसमय व मृत्युसमय; रोपण्याचा समय व रोपलेले उपटण्याचा समय असतो; वधण्याचा समय व बरे करण्याचा समय; मोडून टाकण्याचा समय व बांधून काढण्याचा समय असतो; रडण्याचा समय व हसण्याचा समय; शोक करण्याचा समय व नृत्य करण्याचा समय असतो