उपदेशक 10:1-3
उपदेशक 10:1-3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जसे मरण पावलेल्या माशा गंध्याचे सुगंधी तेल दुर्गंधीत करतात. त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खूपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो. शहाण्याचे मन त्याच्या उजवीकडे आहे. पण मूर्खाचे मन त्याच्या डावीकडे असते. जेव्हा मूर्ख रस्त्यावरून चालतो त्याचे विचार अर्धवट असतात. तो मूर्ख आहे हे प्रत्येकाला दिसते.
उपदेशक 10:1-3 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जशा मेलेल्या माशा सुगंधी तेलाला दुर्गंधी बनवतात, तसेच जराशी मूर्खता सुज्ञान आणि सन्मानावर भारी पडते. सुज्ञानाचे अंतःकरण उजवीकडे नेते, म्हणजे त्याला सत्कार्यास प्रवृत्त करते, पण मूर्खाचे अंतःकरण त्याला डावीकडे, म्हणजे दुष्ट कृत्यांकडे ओढून नेते. मूर्ख व्यक्ती रस्त्याने चालत असला तरी, त्यांना बुद्धीचा अभाव असतो, आणि सर्वांना दाखवितात की ते किती मूर्ख आहेत.
उपदेशक 10:1-3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्यांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा ह्यांवर बसतो. शहाण्याचे मन उजवीकडे पण मूर्खाचे मन डावीकडे असते. मूर्ख आपल्या बुद्धीशी फारकत करून वाटेने चालला असता ज्याला-त्याला म्हणतो, तू मूर्ख आहेस.