YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 33:26-29

अनुवाद 33:26-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे यशुरुना! परमेश्वर देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो. देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ राहते! तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. शत्रूंना नष्ट कर असे तो म्हणतो. म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबाची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षरसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल. इस्राएला, तू आशीर्वादीत आहेस. इतर कोणतेही राष्ट्र तुझ्यासारखे नाही. परमेश्वराने तुला वाचवले आहे. भक्कम ढालीप्रमाणे तो तुझे रक्षण करतो. परमेश्वर म्हणजे तळपती तलवार. शत्रूंना तुझी दहशत वाटेल. त्यांची महान ठिकाणे तू तुडवशील!

सामायिक करा
अनुवाद 33 वाचा

अनुवाद 33:26-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“यशुरूनच्या परमेश्वरासमान कोणी नाही, ते आपल्या वैभवाच्या मेघावर आरूढ होऊन, आकाशमंडळातून तुझ्या साहाय्यार्थ धावून येतात. सनातन परमेश्वर तुमचा आश्रय आहे, आणि सनातन बाहू तुझ्याखाली आहेत. तुझ्या शत्रूंना ते तुझ्यापुढून घालवून देतात, ‘त्यांचा नाश करा!’ असा ते आदेश देतात. म्हणून इस्राएल सुरक्षितेत जगेल; याकोबास संरक्षण प्राप्त होईल, धान्य आणि नव्या द्राक्षारसाने समृद्ध असलेल्या आणि आकाशातील जलांच्या दवबिंदूंनी सिंचित होणार्‍या भूमीत तो सुरक्षित राहील. इस्राएला, तू आशीर्वादित आहेस! इतर कोणत्या लोकांना याहवेहने वाचविले आहे काय? तेच तुझी ढाल व तुझे साहाय्य आहेत आणि तुझ्या वैभवाची तलवार आहेत. तुझे शत्रू तुझ्यापुढे थरथर कापतील, आणि तू त्यांची उच्च स्थाने पायाखाली तुडवशील!”

सामायिक करा
अनुवाद 33 वाचा

अनुवाद 33:26-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे यशुरूना, देवासमान कोणी नाही, तो तुझ्या साहाय्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाशमार्गाने धाव घेतो. अनादी देव तुझा आश्रय आहे, सनातन बाहूंचा तुला आधार आहे; त्याने शत्रूला तुझ्यापुढून हाकून दिले व म्हटले, त्याचा नाश कर. इस्राएल सुरक्षित राहतो; धान्य व द्राक्षारस ह्यांनी समृद्ध अशा प्रदेशी याकोबाचा झरा अलग उफाळत आहे, आणि त्याच्यावरचे आकाश दहिवर वर्षते. हे इस्राएला, तू धन्य आहेस! परमेश्वराने उद्धरलेल्या राष्ट्रा, तुझ्यासमान कोण आहे? तो तुझ्या साहाय्याची ढाल आहे, तुझ्या प्रतापाची तलवार आहे. ह्यामुळे तुझे शत्रू तुला शरण येतील, तू त्यांची उच्च स्थाने पादाक्रांत करशील.”

सामायिक करा
अनुवाद 33 वाचा