अनुवाद 31:7-8
अनुवाद 31:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मोशेने यहोशवाला बोलावले. सर्वांसमक्ष त्यास सांगितले, “खंबीर राहा आणि शौर्य गाजव. या लोकांच्या पूर्वजांना परमेश्वराने जी भूमी द्यायचे कबूल केले आहे, तेथे तू त्यांना नेणार आहेस. ती काबीज करायला या इस्राएलांना तू मदत कर. परमेश्वर तुमच्या सोबतीला तुमच्यापुढेच चालणार आहे. तो तुम्हास सोडून जाणार नाही, तुम्हास अंतर देणार नाही. तेव्हा भिऊ नको आणि निर्भय राहा.”
अनुवाद 31:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग मोशेने यहोशुआला बोलाविले आणि सर्व इस्राएली लोकांसमक्ष त्याला सांगितले, “खंबीर हो आणि हिंमत धर, कारण या लोकांच्या पूर्वजांना याहवेहने वचनपूर्वक देऊ केलेल्या देशात तू त्यांच्यासह जावे आणि ती भूमी त्यांचे वतन म्हणून त्यांना विभागून द्यावी. याहवेह स्वतः तुझ्यापुढे चालतील आणि तुझ्याबरोबर राहतील; ते तुला कधीही सोडणार नाही किंवा त्यागणार नाहीत. भिऊ नकोस; निरुत्साही होऊ नकोस.”
अनुवाद 31:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग मोशेने यहोशवाला बोलावून सर्व इस्राएलांदेखत त्याला सांगितले : “खंबीर हो, हिंमत धर, कारण जो देश ह्यांना देण्याची शपथ परमेश्वराने ह्यांच्या पूर्वजांशी केली होती त्यात तुला ह्या लोकांबरोबर जायचे आहे आणि तो त्यांना वतन म्हणून मिळवून द्यायचा आहे. तुझ्यापुढे चालणारा परमेश्वरच आहे; तो तुझ्याबरोबर असेल; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही; भिऊ नकोस व कचरू नकोस.”