अनुवाद 11:31-32
अनुवाद 11:31-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही यार्देन नदी पार करून जाल. तुमचा देव परमेश्वर देत असलेली जमीन तुम्ही ताब्यात घ्याल. ती तुमची असेल. त्यामध्ये वस्ती कराल तेव्हा मी आज सांगितलेले नियम व विधी यांचे काळजीपूर्वक पालन करा.
सामायिक करा
अनुवाद 11 वाचाअनुवाद 11:31-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही यार्देन नदी ओलांडून याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला देत असलेला देश काबीज करण्यास जात आहात. तुम्ही तो ताब्यात घ्याल आणि तिथे वस्ती कराल, पण मी आज तुमच्यासमोर ठेवत असलेल्या सर्व विधी व नियम पाळण्याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे.
सामायिक करा
अनुवाद 11 वाचाअनुवाद 11:31-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जो देश तुमचा देव परमेश्वर तुम्हांला देत आहे तो वतन करून घेण्यासाठी तुम्ही यार्देन ओलांडून जात आहात; तुम्ही तो ताब्यात घ्याल व त्यात वस्ती कराल. तेव्हा जे विधी व नियम मी आज तुम्हांला देत आहे ते सर्व काळजीपूर्वक पाळा.
सामायिक करा
अनुवाद 11 वाचा