दानीएल 8:19-21
दानीएल 8:19-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो म्हणाला, “बघ, कोपाच्या काळात काय होईल ते मी तुला दाखवतो, कारण तो दृष्टांत शेवटच्या नेमलेल्या दिवसाचा आहे. जो मेंढा तू पाहिला त्यास दोन शिंगे होती, ती माद्य व पारस यांचे राजे आहेत. तो बकरा म्हणजे ग्रीसचा राजा, त्याच्या डोळयाच्या मधोमध असलेले शिंग म्हणजे पहिला राजा आहे.
दानीएल 8:19-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तो म्हणाला: “क्रोधाच्या अखेरच्या समयात काय घडणार आहे हे मी तुला सांगणार आहे, कारण हा दृष्टान्त नेमलेल्या काळाच्या समाप्तीच्या संबंधी आहे. जो मेंढ्याचा स्वामी आणि तू पाहिलेल्या मेंढ्याची दोन शिंगे म्हणजे मेदिया व पर्शियाचे राजे आहेत. तो केसाळ बोकड म्हणजे ग्रीस राष्ट्र होय आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध मोठे शिंग म्हणजे त्या देशाचा पहिला राजा होय.
दानीएल 8:19-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो म्हणाला, “पाहा, कोपाच्या शेवटल्या काळात काय होईल हे मी तुला सांगतो; कारण नेमलेल्या अंतसमयासंबंधाने हा दृष्टान्त आहे. दोन शिंगे असलेला एडका तू पाहिलास; ते मेदय व पारस ह्यांचे राजे. तो दांडगा बकरा ग्रीसचा2 राजा; त्याच्या डोळ्यांच्या मधोमध असलेले मोठे शिंग हा पहिला राजा.