दानीएल 3:29
दानीएल 3:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्यामुळे मी ठराव करतो की, कुणीही लोक, कुठल्याही देशाचे, कोणतीही भाषा बोलणारे जर शद्रख, मेशख, अबेदनगो, यांच्या देवाच्या विरोधात बोलतील तर त्यांचे तुकडे करण्यात येतील, आणि त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील. कारण अशा प्रकारे सोडविणारा दुसरा कोणता देव नाही.
दानीएल 3:29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून मी असे फर्मान काढतो की शद्रख, मेशख आणि अबेदनगोच्या परमेश्वराविरुद्ध कोणतेही राष्ट्र किंवा भाषा बोलणारे काहीही बोलतील तर त्यांचे तुकडे तुकडे करावेत आणि त्यांच्या घरादाराचेही उकिरडे करण्यात यावे. कारण परमेश्वर जसे सोडवितात, तसे दुसर्या कोणत्याही दैवताला करता येणार नाही.”
दानीएल 3:29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्याकरता मी फर्मावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, ह्यांपैकी जे कोणी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे-तुकडे करण्यात येतील; त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील; कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही.”