दानीएल 12:7
दानीएल 12:7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी त्याची वाणी एकेली जो तागाची वस्त्रे घातलेला पुरुष नदीतल्या जलांच्या वरती होता, त्याने आपला उजवा व डावा हात आकाशावर करून म्हटले, जो सदाजीवी आहे त्याची शपथ वाहून म्हटले, एक समय, दोन समय आणि अर्धा समय, साडे तीन वर्ष जेव्हा पवित्रजनांच्या बलाचा चुराडा होईल तेव्हा हे पूर्ण करण्यात येईल. हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले.
दानीएल 12:7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तागाची वस्त्रे नेसलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाने आपला उजवा हात आणि त्याचा डावा हात स्वर्गाकडे उंचाविला व जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची शपथ देऊन सांगितले, “एक समय, दोन समय आणि अर्धा समय. शेवटी जेव्हा पवित्र लोकांच्या शक्तीचा नाश होईल तेव्हा या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”
दानीएल 12:7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून, जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटल्याचे मी ऐकले, “एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे; पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”