कलस्सै 3:17-19
कलस्सै 3:17-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, आपआपल्या पत्नीवर प्रीती करा; तिच्याशी निष्ठूरतेने वागू नका.
कलस्सै 3:17-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा. पत्नींनो, जसे प्रभूला योग्य तसे तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी कठोरतेने वागू नका.
कलस्सै 3:17-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा. स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.
कलस्सै 3:17-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणजेच शद्बात व कृतीत, जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देवपित्याचे आभार माना. पत्नींनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन असा. पतींनो, तुम्ही आपल्या पत्नींवर प्रीती करा व त्यांच्याशी निष्ठुरतेने वागू नका.