कलस्सै 1:24-27
कलस्सै 1:24-27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुमच्यासाठी या माझ्या दुःखात मी आनंद करीत आहे आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखात त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे आणि त्याचे शरीर मंडळी आहे. आणि देवाचे वचन पूर्ण करण्यास तुमच्यासाठी देवाचा कारभार मला दिला आहे. त्यामध्ये मी मंडळीचा सेवक झालो आहे. जे रहस्य युगानुयुग व पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता, त्याच्या पवित्रजनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन आहे. त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्रजनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
कलस्सै 1:24-27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता तुमच्यासाठी दुःख सहन करण्यात मला आनंद आहे; कारण ख्रिस्ताने, त्यांचे शरीर म्हणजे मंडळी हिच्याकरिता सोसलेल्या दुःखातले जे अद्यापि अपूर्ण राहिलेले आहे, ते मी माझ्या शरीरामध्ये भरून काढत आहे. तुम्हाला परमेश्वराचे वचन पूर्णतेने कळावे व ते सादर करता यावे म्हणून मी तिचा सेवक झालो असून माझी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी जे रहस्य युगानुयुग व पिढ्यान् पिढ्या गुप्त ठेवले होते, परंतु आता ते प्रभूच्या लोकांना प्रकट केले आहे. त्यांना परमेश्वराने यासाठी निवडले की, त्यांच्या गौरवाच्या संपत्तीचे रहस्य, म्हणजे तुमच्या गौरवाची आशा, जे ख्रिस्त तुम्हामध्ये आहेत, त्यांना गैरयहूद्यांमध्ये प्रकट करावे.
कलस्सै 1:24-27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमच्यासाठी जी माझी दुःखे त्यांमध्ये मी आनंद करतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे ते मी आपल्या देहाने, त्याचे शरीर जी मंडळी तिच्यासाठी भरून काढत आहे; देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करण्यास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी त्या मंडळीचा सेवक झालो. जे रहस्य युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे ते हे वचन होय. ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे.
कलस्सै 1:24-27 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुमच्यासाठी माझ्या दुःखांमध्ये मी आनंद मानतो आणि ख्रिस्ताच्या क्लेशांतले जे उरले आहे, ते मी माझ्या देहाने, त्याचे शरीर म्हणजे ख्रिस्तमंडळीसाठी भरून काढत आहे. देवाच्या वचनाची पूर्ण सेवा करावयास जो कारभार तुमच्यासाठी देवाने मला सोपवून दिला, त्याप्रमाणे मी ख्रिस्तमंडळींचा प्रसेवक झालो आहे. जे रहस्य युगानुयुगे पिढ्यान्पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता त्याच्या पवित्र लोकांकरता ते प्रकट झाले आहे. ते हे वचन होय. हे गौरवशाली रहस्य त्याच्या लोकांना कळविण्यात यावे, ही देवाची योजना आहे. गौरवशाली आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, तो हे रहस्य आहे.