कलस्सै 1:21-22
कलस्सै 1:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तुम्ही जे एकेकाळी देवाशी परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा, त्याने त्याच्या दैहिक शरीरात त्याच्या मरणाद्वारे, आता, स्वतःशी समेट केला आहे. म्हणजे त्याने तुम्हास त्याच्या दृष्टीपुढे पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे सादर करावे.
कलस्सै 1:21-22 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एकेकाळी तुम्ही परमेश्वराला परके होता आणि वाईट कृत्यामुळे मनाने त्यांचे शत्रू झाला होता. परंतु आता त्यांनी ख्रिस्ताच्या भौतिक शरीराच्या मरणाद्वारे, तुमचा त्यांच्याशी समेट केला आहे, यासाठी की तुम्हाला त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक दोषरहित सादर करावे
कलस्सै 1:21-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, ह्यासाठी की त्याने तुम्हांला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे.
कलस्सै 1:21-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणि जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता, परंतु आता त्याने स्वतःच्या पुत्राच्या शारीरिक मरणाद्वारे तुमचा समेट केला आहे, ह्यासाठी की, त्याने तुम्हाला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे त्याच्या सहवासात आणावे.