आमोस 2:1-3 - Compare All Versions
आमोस 2:1-3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर असे म्हणतो, “मवाबाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी अदोमाच्या राजाची हाडे जाळून त्यांचा चुना केला. म्हणून मी मवाबावर अग्नी पाठवीन, आणि तो करोयोथचे किल्ले खाऊन टाकील. आणि मवाब गोंधळात, आरडाओरड करत आणि रणशिंगाचा आवाज होत असता मरेल. मी तिच्यातील न्यायकरणाऱ्यांना नष्ट करीन, आणि त्याच्यातील सरदारांनाही त्याच्याबरोबर मारून टाकीन.” असे परमेश्वर म्हणतो.
आमोस 2:1-3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह असे म्हणतात, “मोआबच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण त्याने एदोम राजाची हाडे जाळून त्याची राख केली आहे. मी मोआबावर अग्नी पाठवेन तो करीयोथच्या किल्ल्याला भस्म करेन. युद्धाच्या आक्रोशात आणि रणशिंगाच्या आवाजात मोआब प्रचंड नाशाने खाली जाईल. मी तिच्या शासकाचा नाश करेन आणि त्याच्यासोबत तिच्या सर्व अधिकार्यांना मारून टाकेन.” असे याहवेह म्हणतात.
आमोस 2:1-3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर म्हणतो, “मवाबाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण त्याने अदोमाच्या राजाची हाडे भाजून त्यांचा चुना केला. त्यामुळे मी मवाबावर अग्नी पाठवीन, तो करियोथाचे महाल जाळून भस्म करील व त्या दंगलीत रणशब्द व शिंगाचा आवाज होत असता, मवाब नष्ट होईल; मी त्याच्यातल्या शास्त्यांना कापून टाकीन, व त्याच्याबरोबर त्याच्या सर्व सरदारांना मारून टाकीन,” असे परमेश्वर म्हणतो.