Skip to content
बायबल अ‍ॅप लोगो

प्रेषितांची कृत्ये 8:27 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

प्रेषितांची कृत्ये 8:27 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग तो उठला व निघाला; आणि पाहा, एक कूशी1 षंढ, कूशी1 लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते; तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता.

प्रेषितांची कृत्ये 8:27 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

मग तो उठला. व गेला, रस्त्यात त्यास एक इथिओपियाचा मनुष्य भेटला, तो मनुष्य षंढ होता, तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता. तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता, तो यरूशलेम शहरास उपासना करण्यासाठी गेला होता.

प्रेषितांची कृत्ये 8:27 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तो उठला व निघाला आणि पाहा, हबशी राणीचा दरबारातील महत्त्वपूर्ण अधिकारी व खजिनदार असलेला एक हबशी षंढ यरुशलेमहून परत जात होता. तो उपासना करावयास गेला होता.

प्रेषितांची कृत्ये 8:27 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

तेव्हा तो निघाला आणि जात असताना रस्त्यावर त्याला इथिओपिया देशाचा एक षंढ भेटला, हा षंढ इथिओपियाची राणी कांदकेचा महत्त्वाचा अधिकारी व खजिनदार होता. हा मनुष्य यरुशलेमला आराधना करण्यासाठी आला होता