YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 3:6-7 - Compare All Versions

प्रेषितांची कृत्ये 3:6-7 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि पेत्र म्हणाला, “रूपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही; पण जे माझ्याजवळ आहे. ते मी तुला देतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग.” आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले: तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले.

प्रेषितांची कृत्ये 3:6-7 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

परंतु पेत्र त्याला म्हणाला, “माझ्याजवळ चांदी किंवा सोने नाही, परंतु जे आहे ते तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.” मग त्याने त्या मनुष्याचा उजवा हात धरून त्याला उभे राहण्यास मदत केली आणि त्याच क्षणी त्याच्या पायात व घोट्यात बळ प्राप्त झाले.

प्रेषितांची कृत्ये 3:6-7 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग पेत्र म्हणाला, “माझ्याजवळ सोनेरुपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग.” आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यांत तत्काळ बळ आले.

प्रेषितांची कृत्ये 3:6-7 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

परंतु पेत्र म्हणाला, “सोने चांदी माझ्याजवळ नाही, पण जे आहे ते मी तुला देतो. नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने ऊठ आणि चालू लाग.” त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले तेव्हा त्याच्या पायात व घोट्यात तत्काळ बळ आले