प्रेषितांची कृत्ये 3:18-20
प्रेषितांची कृत्ये 3:18-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी, म्हणून देवाने आपल्या सर्व संदेष्ट्याच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते, ते याप्रमाणे पूर्ण केले आहे. तर तुमची पापे पुसून टाकली जावी, म्हणून पश्चात्ताप करा, व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे; आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला, ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे.
प्रेषितांची कृत्ये 3:18-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु ख्रिस्ताने दुःख सहन करावे म्हणून परमेश्वराने सर्व संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे जे भाकीत केले होते, ते पूर्ण केले. यास्तव पश्चात्ताप करा आणि परमेश्वराकडे वळा, म्हणजे तुमची पापे पुसून टाकली जावी व दिवसेंदिवस प्रभूकडून तुम्हाला नवीन शक्ती प्राप्त व्हावी, आणि त्यांनी तुमच्यासाठी ख्रिस्त म्हणून ज्यांची नेमणूक झाली आहे, त्या येशूंना पाठवावे.
प्रेषितांची कृत्ये 3:18-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु देवाने, आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे असे जे सर्व संदेष्ट्यांच्या मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले. तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावीत म्हणून पश्चात्ताप करा व वळा; अशासाठी की, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावेत; आणि तुमच्याकरता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू ह्याला त्याने पाठवावे.
प्रेषितांची कृत्ये 3:18-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ख्रिस्ताने दुःख सहन करावे, असे जे सर्व संदेष्ट्यांद्वारे देवाने पूर्वी सांगितले होते, ते त्याने अशा प्रकारे पूर्ण केले. तुमची पापे माफ व्हावीत म्हणून पश्चात्ताप करा व देवाकडे वळा म्हणजे प्रभूच्या सहवासात तुम्हांलाही नवचैतन्य लाभेल व तो तुमच्याकरता पूर्वी नेमलेला ख्रिस्त म्हणजेच येशू ह्याला पाठवील.