YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 22:6-10

प्रेषितांची कृत्ये 22:6-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्क शहराजवळ पोहचलो तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” अशी वाणी माझ्याबरोबर मी बोलताना ऐकली. मी विचारले, प्रभूजी, तू कोण आहेस? त्याने मला म्हटले, “ज्या नासोरी येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.” तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, प्रभूजी मी काय करावे? प्रभूने मला म्हटले, “उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.”

प्रेषितांची कृत्ये 22:6-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“दुपारच्या समयी मी दिमिष्कच्या जवळ आलो असताना, अकस्मात आकाशातून माझ्याभोवती प्रकाश चकाकताना पाहिला. मी जमिनीवर पडलो, तेव्हा इब्री भाषेत बोलणारी वाणी मी ऐकली, ‘शौला! शौला! तू माझा छळ का करीत आहेस?’ “ ‘प्रभूजी, आपण कोण आहात?’ मी विचारले. “प्रभूने मला उत्तर दिले, ‘ज्याचा तू छळ करीत आहेस, तोच मी नासरेथकर येशू आहे,’ माझ्या सहकार्‍यांनी प्रकाश पाहिला, परंतु जे माझ्याशी बोलत होते त्यांची वाणी त्यांनी ओळखली नाही. “मी विचारले, ‘प्रभू मी काय करावे?’ “प्रभू म्हणाले, ‘आता उठून उभा राहा आणि दिमिष्कमध्ये जा, जे काही तुला करावयाचे आहे, ते तुला तिथे सांगण्यात येईल.’

प्रेषितांची कृत्ये 22:6-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग असे झाले की, जाता जाता मी दिमिष्काजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. तेव्हा मी जमिनीवर पडलो, आणि ‘शौला, शौला, माझा छळ का करतोस?’ अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, ‘प्रभूजी, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासोरी येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’ तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला अन् ते घाबरले, परंतु माझ्याबरोबर बोलणार्‍याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, ‘प्रभूजी, मी काय करावे?’ प्रभूने मला म्हटले, ‘उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.’

प्रेषितांची कृत्ये 22:6-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

जाता जाता मी दिमिष्कजवळ पोहचलो, तेव्हा दुपारच्या वेळेस माझ्याभोवती एकाएकी प्रखर प्रकाश आकाशांतून चमकला. मी जमिनीवर पडलो आणि ‘शौल, शौल, माझा छळ का करतोस?’, अशी वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली. मी विचारले, ‘प्रभो, तू कोण आहेस?’ त्याने मला म्हटले, ‘ज्या नासरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे.’ माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मी म्हणालो, ‘प्रभो, मी काय करावे?’ प्रभूने मला म्हटले, ‘उठून दिमिष्क येथे जा, तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, ते सर्व तुला तेथे सांगण्यात येईल.’