प्रेषितांची कृत्ये 2:46-47
प्रेषितांची कृत्ये 2:46-47 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत; सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत, असलेल्या मनुष्यांची दररोज मंडळीत भर घालीत असे.
प्रेषितांची कृत्ये 2:46-47 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दररोज मंदिराच्या अंगणात ते एकत्र जमत होते आणि त्यांच्या घरांमध्ये भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व कृतज्ञ मनाने एकत्र खात होते, परमेश्वराची स्तुती करीत होते आणि सर्व लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळाल्याचा आनंद ते करीत होते आणि प्रभूने त्यांच्या संख्येत प्रत्येक दिवशी तारण पावलेल्यांची भर घातली.
प्रेषितांची कृत्ये 2:46-47 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे.
प्रेषितांची कृत्ये 2:46-47 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत. देवाची स्तुती करीत सर्व लोकांच्या सद्भावना त्यांच्या पाठीशी असत. तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची भर प्रभू दररोज त्यांच्यात घालत असे.