प्रेषितांची कृत्ये 2:2-4
प्रेषितांची कृत्ये 2:2-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
प्रेषितांची कृत्ये 2:2-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
एकाएकी स्वर्गातून प्रचंड सोसाट्याच्या वार्यासारखा आवाज आला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर त्याने भरले. त्यावेळी अग्नीच्या जिभांसारख्या दिसणार्या जिभा वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर एकएक अशा स्थिरावताना त्यांना दिसल्या. तिथे उपस्थितीत असलेले सगळे जण पवित्र आत्म्याने भरले आणि आत्म्याने हे करण्यास त्यांना समर्थ केल्यामुळे ते वेगवेगळ्या भाषेत बोलू लागले.
प्रेषितांची कृत्ये 2:2-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा अकस्मात मोठ्या वार्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
प्रेषितांची कृत्ये 2:2-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अकस्मात आकाशातून सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आवाज झाला व ज्या घरात ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरले. नंतर अग्नीसारख्या निरनिराळ्या जिभा त्यांना दिसल्या व त्या प्रत्येकावर एक एक अशा स्थिरावल्या. ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.