YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 17:2-3 - Compare All Versions

प्रेषितांची कृत्ये 17:2-3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रलेखावरून वादविवाद केला. त्यांने शास्त्रलेखाचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मरण पावलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे.

प्रेषितांची कृत्ये 17:2-3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आपल्या रीतीप्रमाणे, पौल सभागृहामध्ये गेला आणि लागोपाठ तीन शब्बाथ दिवस त्याने धर्मशास्त्रावरून त्यांच्याशी संवाद केला, त्याने त्यांना स्पष्टीकरण करून पटवून दिले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यामधून पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. तो त्यांना म्हणाला, “या येशूंची मी तुम्हाला घोषणा करीत आहे, तेच ख्रिस्त आहेत.”

प्रेषितांची कृत्ये 17:2-3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रावरून वादविवाद केला. त्याने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, “ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते, आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करत आहे तोच तो ख्रिस्त आहे.”

प्रेषितांची कृत्ये 17:2-3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांच्याकडे जाऊन तीन साबाथ त्यांच्याबरोबर धर्मशास्त्राविषयी वादविवाद केला. त्याने धर्मशास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले, “ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करीत आहे, तोच तो ख्रिस्त आहे.”