प्रेषितांची कृत्ये 15:3 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 15:3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग मंडळीने त्यांची बोळवण केल्यावर ते फेनिके व शोमरोन ह्यांमधून गेले, आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.
प्रेषितांची कृत्ये 15:3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मंडळीने त्यांना पाठवल्यावर ते फेनीके व शोमरोन या शहरामधून गेले आणि परराष्ट्रीय देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.
प्रेषितांची कृत्ये 15:3 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग ख्रिस्तमंडळीने त्यांना निरोप दिल्यावर ते फेनिके व शोमरोन यांमधून गेले आणि यहुदीतर लोक देवाकडे वळल्याचे सविस्तर वर्तमान सांगून त्यांनी सर्व बंधुजनांना फार आनंदित केले.
प्रेषितांची कृत्ये 15:3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर मंडळीने त्यांना निरोप देऊन पाठविले आणि जसे ते फेनिके आणि शोमरोनामधून प्रवास करीत गेले, गैरयहूदीयांचे कसे परिवर्तन झाले हे त्यांनी तेथील लोकांना सांगितले. या बातमीने सर्व विश्वासणार्यांना अतिशय आनंदित केले.