प्रेषितांची कृत्ये 13:50-52
प्रेषितांची कृत्ये 13:50-52 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा यहूदी लोकांनी शहरातील काही धार्मिक स्त्रिया व पुढारी यांना भडकावून दिले, त्या लोकांनी पौल व बर्णबा यांच्याविरुद्ध अनेक वाईट गोष्टी केल्या आणि त्यांना शहराबाहेर घालवून दिले. मग पौल व बर्णबा यांनी आपल्या पायाची धूळ झटकली व ते इकुन्या शहराला गेले. इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
प्रेषितांची कृत्ये 13:50-52 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु यहूदी पुढार्यांनी शहरातील उच्च वर्गातील धार्मिक स्त्रियांना व प्रमुख व्यक्तींना चिथविले. त्यांनी पौल व बर्णबा यांचा छळ करून त्यांना त्यांच्या प्रांतातून हाकलून दिले. तेव्हा त्यांनी इशारा म्हणून त्या शहराची धूळ तिथेच झटकून टाकली आणि ते इकुन्यास गेले. आणि शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.
प्रेषितांची कृत्ये 13:50-52 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा यहूदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले. इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.
प्रेषितांची कृत्ये 13:50-52 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
यहुदी लोकांनी भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील प्रतिष्ठित पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्णबा ह्यांचा छळ करून त्यांना आपल्या प्रदेशाबाहेर घालवून लावले. प्रेषित त्यांचा विरोध दर्शवीत पायांची धूळ झटकून तेथून इकुन्य येथे गेले. अंत्युखियामधील श्रद्धावंत आनंदाने व पवित्र आत्म्याने भरून गेले.