YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 13:29-31 - Compare All Versions

प्रेषितांची कृत्ये 13:29-31 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

मग त्याच्याविषयी लिहिलेले सर्वकाही पूर्ण करून त्यांनी त्याला खांबावरून खाली काढून कबरेमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले. त्याच्याबरोबर जे गालीलाहून यरुशलेमेत आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे; ते आता लोकांना त्याचे साक्षी आहेत.

प्रेषितांची कृत्ये 13:29-31 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते, ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले, मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले व त्यास कबरेत ठेवले. पण देवाने त्यास मरणातून उठवले. यानंतर, पुष्कळ दिवसांपर्यंत जे त्याच्याबरोबर होते, त्यांना गालील प्रांतापासून यरूशलेम शहरापर्यंत येशूने दर्शन दिले, ते लोक आता त्याचे साक्षीदार म्हणून लोकांसमोर आहेत.

प्रेषितांची कृत्ये 13:29-31 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्याच्याविषयी लिहिलेले सर्व काही पूर्ण करून त्यांनी त्याला क्रुसावरून खाली काढून कबरीमध्ये ठेवले. पण देवाने त्याला मरणातून उठवले. त्याच्याबरोबर जे गालीलहून यरुशलेम येथे आले होते त्यांच्या दृष्टीस तो पुष्कळ दिवस पडत असे, ते आता इस्राएली लोकांसाठी त्याचे साक्षीदार आहेत.

प्रेषितांची कृत्ये 13:29-31 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यांच्याबद्दलची सर्व भविष्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांना क्रूसावरून खाली उतरविले व कबरेत ठेवले. परंतु परमेश्वराने त्यांना मृतांतून उठविले, जे गालीलाहून प्रवास करीत यरुशलेमला त्यांच्याबरोबर आले होते, त्यांना पुष्कळ दिवस ते प्रकट झाले. तेच आता आपल्या लोकांस त्यांचे साक्षीदार आहेत.