प्रेषितांची कृत्ये 13:24 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
प्रेषितांची कृत्ये 13:24 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो प्रकट होण्यापूर्वी योहानाने पुढे येऊन पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी सर्व इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती.
प्रेषितांची कृत्ये 13:24 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
येशू येण्यापूर्वी सर्व इस्राएली लोकांस योहानाने उपदेश केला, त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांस सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे.
प्रेषितांची कृत्ये 13:24 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच्या प्रकट होण्यापूर्वी, योहानने पुढे येऊन पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा सर्व इस्रायली लोकांमध्ये केली होती.
प्रेषितांची कृत्ये 13:24 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
येशू येण्यापूर्वी, योहानाने सर्व इस्राएली लोकांना पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा उपदेश केला.