YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 तीमथ्य 4:1-4

2 तीमथ्य 4:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वरासमक्ष आणि जे आपले राज्य स्थापन करण्यासाठी येतील, तेव्हा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करतील, त्या ख्रिस्त येशूंसमक्ष मी तुला आदेश देतो की: तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर. कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक शुद्ध शिक्षण स्वीकारणार नाहीत. त्याऐवजी, स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याभोवती असंख्य शिक्षक एकत्रित करतील जे त्यांच्या कानाची खाज जिरविणारे उपदेश देतील. ते सत्यापासून आपले कान फिरवतील आणि काल्पनिक कथांकडे वळतील.

सामायिक करा
2 तीमथ्य 4 वाचा