YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 तीमथ्य 1:6-10

2 तीमथ्य 1:6-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या कारणासाठी मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामूळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर. कारण देवाने आम्हास भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्याप्रमाणे तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे. त्याने आम्हास तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती. पण जी आता आम्हास आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.

सामायिक करा
2 तीमथ्य 1 वाचा

2 तीमथ्य 1:6-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

म्हणूनच तुझ्यावर मी हात ठेवल्याने, परमेश्वराची जी देणगी तुला मिळाली, त्या देणगीला तू नव्याने प्रज्वलित केले पाहिजे. याची मी तुला आठवण देत आहे. कारण परमेश्वराने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही, तर सामर्थ्य, प्रीती आणि आत्मसंयमनाचा आत्मा दिला आहे. म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यास आणि जो मी त्यांचा बंदिवान, त्या माझ्याविषयी तू लाज वाटून घेऊ नकोस, तर शुभवार्तेसाठी परमेश्वराच्या सामर्थ्याने तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे. त्यांनीच आपले तारण केले आणि पवित्र जीवनासाठी आपल्याला पाचारण केले हे त्यांनी आपण काही केले म्हणून नव्हे, तर स्वतःच्या हेतूसाठी व कृपेमुळे केले. ही कृपा आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये युगाच्या पूर्वी दिलेली होती. तर आता आपला तारणारा ख्रिस्त येशूंच्या देखाव्याने प्रकट झाली आहे, ज्यांनी एकीकडे मृत्यूचा नाश केला आणि दुसरीकडे ईश्वरीय शुभवार्तेद्वारे जीवन आणि अमरत्व प्रकाशित केले.

सामायिक करा
2 तीमथ्य 1 वाचा

2 तीमथ्य 1:6-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या कारणास्तव मी तुला आठवण देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नयेस; तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दु:ख सोसावे. त्याने आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वत:च्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने पाचारले आहे; ही कृपा युगांच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आपल्यावर करण्यात आली होती; ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले, आणि सुवार्तेच्या द्वारे जीवन व अविनाशिता ही प्रकाशित केली आहेत.

सामायिक करा
2 तीमथ्य 1 वाचा

2 तीमथ्य 1:6-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

मी तुला आठवण करून देतो की, देवाचे जे कृपादान मी तुझ्यावर हात ठेवून केलेल्या प्रार्थनेमुळे तुझ्यामध्ये आहे, ते प्रज्वलित कर; कारण देवाने आपल्याला भीतीचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. म्हणून आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिमाणाने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे. त्याने आपल्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने आमंत्रित केले आहे. ही कृपा काळाच्या प्रारंभापूर्वी ख्रिस्त येशूद्वारे आपल्यावर करण्यात आली. परंतु आता आपल्याला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने ती दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि शुभवर्तमानाद्वारे शाश्वत जीवन प्रकट केले आहे.

सामायिक करा
2 तीमथ्य 1 वाचा

2 तीमथ्य 1:6-10

2 तीमथ्य 1:6-10 MARVBSI2 तीमथ्य 1:6-10 MARVBSI2 तीमथ्य 1:6-10 MARVBSI2 तीमथ्य 1:6-10 MARVBSI2 तीमथ्य 1:6-10 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा