YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 थेस्सल 2:1-12 - Compare All Versions

2 थेस्सल 2:1-12 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही एकदम दचकून भांबावून जाऊ नका व घाबरू नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका; कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल; तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे. मी तुमच्याबरोबर असतांना हे तुम्हास सांगत असे याची तुम्हास आठवण नाही काय? त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हास ठाऊक आहे. कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवीत आहे, परंतु जो आता अडथळा करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत अडथळा करीत राहील; मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील; सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अद्भूते करीत येईल ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भूते आणि सर्वप्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्याठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो; ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांचा न्यायनिवाडा व्हावा म्हणून असे होईल.

सामायिक करा
2 थेस्सल 2 IRVMAR

2 थेस्सल 2:1-12 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पुन्हा येणे व आपले त्यांच्याजवळ एकवटणे यासंबंधी बंधूंनो आणि भगिनींनो मी तुम्हाला सांगतो, आमच्याद्वारे दिलेल्या तथाकथित शिक्षणाद्वारे तुम्ही सहज अस्थिर किंवा गोंधळून जाऊ नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, असे ठामपणे आपल्या संदेशाद्वारे किंवा बोलण्याद्वारे किंवा पत्राद्वारे सांगणार्‍यांना घाबरून जाऊ नका. कोणी तुमची कोणत्याही प्रकारे फसवणूक करू नये, जोपर्यंत विश्वासाचे पतन होणार नाही आणि नियम नसलेला पुरुष म्हणजे नाशाचा पुरुष प्रकट होणार नाही तोपर्यंत तो दिवस येणार नाही. तो तथाकथित देव किंवा भजनीय वस्तूंचा विरोध करेल व या सर्वांहून स्वतःला उंच करेल, तो परमेश्वराच्या मंदिरात बसेल व मीच परमेश्वर आहे, असे जाहीर करेल. मी तुमच्याबरोबर तिथे असताना, हे सांगितल्याचे तुम्हाला आठवत नाही का? आणि आता त्याने योग्य वेळेस प्रकट व्हावे म्हणून त्याला कोणत्या गोष्टीचे अडखळण आहे हे तुम्हाला माहीत आहे. कारण अधर्माचे गुप्त सामर्थ्य आधी कार्यान्वित आहे, ते आधीच सुरू झालेले आहे. परंतु जो प्रतिबंध करीत आहे, तो मार्गातून दूर होईपर्यंत ते तसेच सुरू राहणार आहे. मग हा अधर्मी पुरुष प्रकट होईल, पण प्रभू येशू त्याला मुख श्वासाने मारून टाकतील आणि आपल्या आगमनाच्या प्रतापाने त्याचा नाश करतील. सैतान कशाप्रकारे कार्य करतो त्यानुसार अनीतिमानाचे येणे असेल. तो विलक्षण सामर्थ्याच्याद्वारे खोटी चिन्हे आणि अद्भुते करून दाखवेल, आणि ज्यांचा नाश होत आहे त्यांना त्यांच्या सर्व मार्गात दुष्टतेने फसवेल. त्यांचा नाश होत आहे कारण त्यांनी आपल्या तारणासाठी सत्यावर प्रीती करण्यास नकार दिला. या कारणामुळे परमेश्वर त्यांच्यावर तीव्र भ्रांती पाठवतील यासाठी की ते लबाडीवर विश्वास ठेवतील, आणि ज्या सर्वांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही आणि दुष्टपणात आनंद मानला, त्या सर्वांना दोषी ठरविण्यात येईल.

सामायिक करा
2 थेस्सल 2 MRCV

2 थेस्सल 2:1-12 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यांसंबंधाने आम्ही तुम्हांला अशी विनंती करतो की, तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका; ख्रिस्ताचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणार्‍या आत्म्याने, किंवा जणू काय आमच्याकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रकट होईल. तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगत असे ह्याची तुम्हांला आठवण नाही काय? त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करत आहे ते तुम्हांला ठाऊक आहे. कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करत राहील. मग तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, त्याला प्रभू येशू ‘आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील’, आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील. ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही; त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो; ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांना शासन व्हावे म्हणून असे होईल.

सामायिक करा
2 थेस्सल 2 MARVBSI

2 थेस्सल 2:1-12 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याचे व आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही आवाहन करतो की, तुम्ही एकदम मनात गोंधळून जाऊ नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे, अशा विचाराने चिंताग्रस्त होऊ नका. कदाचित आमच्याकडून आलेल्या भविष्यवाणीतून, प्रबोधनातून किंवा पत्रातून आम्हीच असे म्हटले, असा विचार केला जात असावा. कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर अंतिम बंड पुकारले जाऊन तो अनाचारी प्रकट होईल. तो नाशाचा पुत्र, विरोधक असून तथाकथित प्रत्येक दैवत किंवा पूज्य म्हणून म्हणतात त्या वस्तूपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजून म्हणजे ‘मी देव आहे’, असे स्वतःचे प्रदर्शन करीत तो देवाच्या मंदिरात जाऊन बसेल. मी तुमच्याबरोबर असताना हे तुम्हांला सांगितले होते, ह्याची तुम्हांला आठवण नाही काय? तरीही आता ह्या गोष्टीच्या आड काहीतरी येत आहे व ती गोष्ट कोणती, हे तुम्हांला ठाऊक आहे. म्हणजेच तो नेमलेल्या समयी प्रकट होईल. तो रहस्यमय अनाचार आत्ताच आपले कार्य करीत आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे, तो मार्गामधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. मग तो अनाचारी प्रकट होईल. परंतु जेव्हा प्रभू येशू येईल, तेव्हा त्याच्या मुखातून निघणाऱ्या उच्छ्‍वासाने तो त्या अनाचाऱ्याला ठार करील व आपल्या आगमनाच्या प्रकटीकरणाने त्याचा नाश करील. त्या अनाचाऱ्याचे आगमन सैतानी कार्यात दिसून येते. तो सर्व सामर्थ्य, चिन्हे, खोटे चमत्कार व ज्यांचा नाश होणार आहे, त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दुष्ट फसवेगिरीचा प्रयोग करील कारण त्यांनी तारणासाठी ज्या सत्याचे स्वागत करून आवड धरायला हवी होती, ते केले नाही. ह्यामुळे त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांच्यामध्ये भ्रांतीचे कार्य चालू राहील, असे देव करील. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांना दोषी ठरवण्यात यावे, म्हणून असे होईल.

सामायिक करा
2 थेस्सल 2 MACLBSI