मजकुराकडे जा

२ शमुवेल 5:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

२ शमुवेल 5:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

गतकाली शौल आमच्यावर राजा असता इस्राएल लोकांची नेआण करणारे पुढारी आपणच होता; आणि परमेश्वर आपणास म्हणाला होता की, माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील.”

२ शमुवेल 5 MARVBSI

२ शमुवेल 5:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

शौल राज्यावर होता तेव्हा सुध्दा तुम्हीच युध्दात आमचे नेतृत्व करत होता. इस्राएलांना युध्दावरून तुम्हीच परत आणत होता. खुद्द परमेश्वर तुम्हास म्हणाला, “माझ्या इस्राएल प्रजेचा तू मेंढपाळ होशील. इस्राएलवर राज्य करशील.”

२ शमुवेल 5 IRVMAR

२ शमुवेल 5:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मागील काळात, जेव्हा शौल आमचा राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेहने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”

२ शमुवेल 5 MRCV