२ शमुवेल 22:26-31 - Compare All Versions
२ शमुवेल 22:26-31 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दयाळू जनांशी तू दयेने वागतोस, सात्त्विकाशी सात्त्विकतेने वागतोस; शुद्ध जनांशी तू शुद्ध भावनेने वागतोस कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस. दीन जनांस तू तारतोस, उन्मत्त जनांवर दृष्टी ठेवून त्यांचा अध:पात करतोस. हे परमेश्वरा, तू माझा दीप आहेस; परमेश्वर माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो. तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो. देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे; परमेश्वराचे वचन कसास लागलेले आहे; त्याचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे.
२ शमुवेल 22:26-31 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखाद्याचे आपल्यावर खरे प्रेम असेल तर आपणही त्याची भरपाई खऱ्या प्रेमाने करू. तो आपल्याशी प्रामाणिक असेल तर आपणही प्रामाणिक राहू. हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि कुटिलांशी तू ही कुटिलतेने वागतोस. परमेश्वरा, दीनांना तू मदत करतोस, गर्विष्ठांना धडा शिकवतोस. परमेश्वरा, तू माझा दीप आहेस. माझ्या भोवतीचा अंधकार तू उजळवून टाकतोस. परमेश्वरा, तुझ्या मदतीनेच मी सैन्यावर चाल करू शकतो. देवाच्या मदतीनेच मी शत्रूंची भिंतसुध्दा पार करू शकतो. देवाची सत्ता सर्वकष आहे. परमेश्वराचे वचन कसोटीला उतरलेले आहे. त्याच्यावर भरवसा टाकणाऱ्या, सर्वांची तो ढाल आहे.
२ शमुवेल 22:26-31 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात, व निर्दोषांशी तुम्ही निर्दोषतेने वागता, शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता, परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता. नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त लोकांवर नजर ठेवून तुम्ही त्यांचा अधःपात करतात. हे याहवेह, तुम्ही माझे दीप आहात; याहवेह माझ्या अंधाराचा प्रकाश करतात. तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो; माझ्या परमेश्वरामुळे मी गड चढू शकतो. “परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.