YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 11:2-3 - Compare All Versions

२ शमुवेल 11:2-3 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

संध्याकाळी तो आपल्या पलगांवरून उठला, आणि राजमहालाच्या छतावरून फिरु लागला. तिथून त्यास एक स्त्री स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती. तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली सेवकाने सांगितले ती अलीयमची मुलगी बथशेबा, उरीया हित्ती याची पत्नी आहे.

सामायिक करा
२ शमुवेल 11 IRVMAR

२ शमुवेल 11:2-3 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

एके संध्याकाळी दावीद त्याच्या बिछान्यावरून उठला आणि आपल्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरू लागला. गच्चीवरून त्याने एका स्त्रीला स्नान करताना पाहिले. ती स्त्री फार सुंदर होती, दावीदाने तिच्याबद्दल चौकशी करण्यासाठी कोणा एकाला पाठवले. तो मनुष्य म्हणाला, “ती एलीयामची कन्या, हिथी उरीयाहची पत्नी, बथशेबा आहे.”

सामायिक करा
२ शमुवेल 11 MRCV

२ शमुवेल 11:2-3 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राज-मंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला; तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली; ती स्त्री दिसायला फार सुंदर होती. मग दाविदाने चाकर पाठवून त्या स्त्रीविषयी विचारपूस केली; तेव्हा कोणी म्हटले, “ती अलीयामाची कन्या व उरीया हित्ती ह्याची बायको बथशेबा आहे ना?”

सामायिक करा
२ शमुवेल 11 MARVBSI