2 पेत्र 1:19-21
2 पेत्र 1:19-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल. तुम्ही प्रथम हे जाणा की, शास्त्रलेखातील कोणताही संदेश स्वतः अर्थ लावण्यासाठी झाला नाही. कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.
2 पेत्र 1:19-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आमच्याकडे संदेष्ट्यांचा निश्चित संदेश आहे, तो अंधारात प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. सर्वात महत्त्वाचे, प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा संदेष्ट्यांच्या स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही. कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.
2 पेत्र 1:19-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे1 वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. प्रथम हे ध्यानात ठेवा की, शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही; कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.
2 पेत्र 1:19-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणून आम्हांला अधिक खात्री वाटते की, संदेष्ट्यांचे वचन जे आमच्याजवळ आहे, ते काळोखात प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल, तर बरे होईल. प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही परमेश्वरप्रेरित संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही. कारण परमेश्वरप्रेरित संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही. तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश सांगितला आहे.