२ करिंथ 9:6-7
२ करिंथ 9:6-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे लक्षात ठेवा जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करील आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करील. प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो.
२ करिंथ 9:6-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु हे लक्षात ठेवा जो कोणी राखून पेरतो, तर तो राखूनच कापणी करेल. जो उदारपणे बी पेरतो, तो उदारपणे कापणी करेल. आपण किती द्यावे हे ज्याने त्याने स्वतः मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, हे भाग पाडते म्हणून किंवा बळजबरीने नव्हे, कारण संतोषाने देणारा परमेश्वराला आवडतो.
२ करिंथ 9:6-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो.
२ करिंथ 9:6-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो, तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो, तो मोठ्या प्रमाणात कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, नाखुशीने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण आनंदाने देणारा देवाला आवडतो.