२ करिंथ 6:14-18
२ करिंथ 6:14-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’ आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन. आणि मी तुम्हास पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’
२ करिंथ 6:14-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
विश्वासहीन लोकांबरोबर संबंध जोडून सहभागी होऊ नका; कारण नीतिमत्व व दुष्टता यामध्ये साम्य आहे काय? किंवा प्रकाश व अंधकार यामध्ये काही भागीदारी आहे काय? तसेच ख्रिस्त व सैतान यांच्यामध्ये मेळ कसा असेल? विश्वासी मनुष्य विश्वासहीन मनुष्य यामध्ये साम्य आहे का? आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे: “मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये चालेन; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.” यास्तव, “त्यांच्यामधून निघा आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभूने म्हटले आहे त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.” आणि “मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व माझ्या कन्या व्हाल असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतात.”
२ करिंथ 6:14-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी1 एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत; देवाने असे म्हटले आहे की, “‘मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’ म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’ आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”
२ करिंथ 6:14-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून बिजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची सहभागिता कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार? ख्रिस्ताची एकवाक्यता सैतानाशी कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत! स्वतः देवाने असे म्हटले आहे, मी त्यांच्यामध्ये निवास करून राहीन व त्यांच्यात फिरेन, मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. म्हणून, त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करीन. मी तुमचा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व कन्या व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.