२ करिंथ 4:13-14
२ करिंथ 4:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी विश्वास ठेवला आणि म्हणून मी बोललो, हे पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही विश्वास ठेवला आहे आणि म्हणून बोलतो; कारण आमच्यात तोच विश्वासाचा आत्मा आहे. कारण आम्ही हे जाणतो की, प्रभू येशूला ज्याने उठवले तो आपल्यालाही येशूबरोबर उठवील आणि आम्हास तुमच्याबरोबरच सादर करील.
२ करिंथ 4:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
असे लिहिले आहे: “मी विश्वास ठेवला आहे म्हणून मी बोललो,” त्याप्रमाणे आमच्याजवळ सारखाच विश्वासाचा आत्मा आहे, म्हणून आम्ही विश्वास ठेवतो आणि बोलतो. आम्हाला हे माहीत आहे की, ज्यांनी प्रभू येशूंना मेलेल्यांमधून जिवंत केले, तेच आम्हालाही येशूंबरोबर पुन्हा जिवंत करतील आणि तुमच्याबरोबरच आम्हाला स्वतःपुढे सादर करतील.
२ करिंथ 4:13-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘मी विश्वास धरला म्हणून बोललो,’ ह्या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा तोच आत्मा आमच्या ठायी असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हांला ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला उठवले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवील व तुमच्याबरोबर सादर करील.
२ करिंथ 4:13-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
‘मी विश्वास धरला म्हणून बोललो,’ असा धर्मशास्त्रलेख आहे. त्याच श्रद्धामय वृत्तीने आम्हीदेखील विश्वास धरतो म्हणून बोलतो. आम्हांला हे ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला मरणातून उठविले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवून, तुमच्याबरोबर त्याच्या समक्षतेत नेईल.