२ करिंथ 2:15-17
२ करिंथ 2:15-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकात आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत. ज्या लोकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत आणि या गोष्टींसाठी कोण लायक आहे? कारण दुसर्या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही पण आम्ही शुद्ध भावाने, देवाचे म्हणून देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.
२ करिंथ 2:15-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांचे तारण होत आहे व ज्यांचा नाश होत आहे त्या सर्वांसाठी आम्ही परमेश्वरासाठी ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत एकाला आम्ही असा सुगंध आहोत की ज्यामुळे मरण येते व दुसर्याला असा सुगंध आहोत की ज्यामुळे जीवन मिळेल. आणि अशा कामासाठी कोण योग्य आहे? आम्ही अशा अनेक लोकांसारखे नाही की जे परमेश्वराचे वचन सांगून लाभ मिळवितात. उलट ख्रिस्तामध्ये आम्ही परमेश्वरासमोर प्रामाणिकपणाने आणि परमेश्वराने पाठविलेल्या माणसाप्रमाणे बोलत असतो.
२ करिंथ 2:15-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तारणप्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहोत; एकाला मृत्यूचा मरणसूचक गंध, आणि एकाला जीवनाचा जीवनसूचक गंध आहोत. हे कार्य करण्यास कोण लायक आहे? पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्त्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत.
२ करिंथ 2:15-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण तारण होत असलेल्या आणि नाश होत असलेल्या अशा लोकांसाठी आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा सुगंध आहोत; नाश होत असलेल्या लोकांसाठी मृत्यूचा मरणसूचक गंध आणि तारणप्राप्ती होत असलेल्या लोकांसाठी जीवनाचा जीवनदायक गंध आहोत. हे कार्य करावयास कोण सक्षम आहे? पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर देवाने आम्हांला पाठवले आहे म्हणून प्रामाणिकपणे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताचे सेवक म्हणून बोलणारे आहोत.