YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 12:7-8 - Compare All Versions

२ करिंथ 12:7-8 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्‍या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे. माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली.

सामायिक करा
२ करिंथ 12 IRVMAR

२ करिंथ 12:7-8 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

मला झालेल्या श्रेष्ठ प्रकटीकरणांमुळे मी फुगून जाऊ नये व बढाया मारू नये म्हणून मला शारीरिक काटा देण्यात आला आणि सैतानाचा दूत त्रास देण्याकरिता ठेवण्यात आला. मी प्रभूला तीन वेळा हे माझ्यापासून काढून घ्यावे म्हणून विनंती केली.

सामायिक करा
२ करिंथ 12 MRCV

२ करिंथ 12:7-8 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी फार चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली

सामायिक करा
२ करिंथ 12 MARVBSI

२ करिंथ 12:7-8 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी फुगून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे सैतानाचा एक हस्तक माझ्यावर प्रहार करण्याकरिता ठेवण्यात आला होता. हा माझ्यापासून काढला जावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली.

सामायिक करा
२ करिंथ 12 MACLBSI